मा.श्री. विजय एस घोणसे पाटील

मुख्य कार्यकारी अधिकारी/कार्यकारी संचालक

मा.श्री. विजय एस घोणसे पाटील

मुख्य कार्यकारी अधिकारी/कार्यकारी संचालक

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी/कार्यकारी संचालक पदी श्री.विजय घोणसे पाटील कार्यरत आहेत. श्री.घोणसे पाटील यांचे शिक्षण एम.ए. (अर्थशास्त्र), एम.बी.ए. (बँकींग अॅन्ड फायनान्स), सी.ए.आय.आय.बी., सी.टी.एफ., सी.सी.बी., एच.डी.सी.एम., जी.डी.सी.अॅन्ड ए. असुन आय.टी.क्षेत्रातील डिप्लोमा सुध्दा पास केलेला आहे. श्री.घोणसे पाटील यांनी साल सन 1986 ते 2011 या कालावधीमध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदावर कामकाज केलेले आहे. या कालावधीमधील एक वर्षे त्यांनी जयशिवशंकर सहकारी साखर कारखान्याचे उभारणीचे कालावधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणुनही कामकाज केलेले आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असताना मुख्यालयातील शेती कर्ज विभागाअंतर्गत प्रा.वैद्यनाथन कमिटी कामकाज कक्षाचे मुख्य समन्वयक म्हणुन उत्कृष्ट कार्य केलेले आहे. तसेच प्रा.वैद्यनाथन कमिटी कामकाज अंतर्गत त्यांनी मास्टर ट्रेनर म्हणुनही कामकाज केलेले आहे. याच कालावधीमध्ये वि.का.सेवा सहकारी संस्थासाठी प्रा.वैद्यनाथन कमिटीने शिफारस केल्यानुसार सर्व संस्थासाठी समान लेखा पध्दतीचा अवलंब करण्याबाबत धोरण स्विकारण्यात आलेले होते. त्यानुसार सर्व संस्थासाठी एकसमान हिशोब लिखान संबंधाने मार्गदर्शक पुस्तिका तयार करून सेवा संस्थांच्या सचिवासाठी एक चांगले मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून दिली होती.

प्रा.वैद्यनाथन कमिटीच्या शिफारसीनुसार एकसमान जमाखर्च कसा करावा या संबंधी महाराष्ट्रातील 17 जिल्हयांमध्ये एकुण 72 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम घेवुन बँक अधिकारी, संस्था सचिव, लेखा परिक्षक यांना प्रशिक्षण दिलेले आहे. श्री.घोणसे पाटील यांनी दि.15/06/2011 पासुन ते 30/06/2014 पर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कामकाज केलेले आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या 3 वर्षाचे कालावधीमध्ये बँकेस बँकींग परवाना प्राप्त करून दिलेला आहे. तीन वर्षाचे कमी कालावधीमध्ये भाग भांडवलात लक्षणीय वाढ करून, तसेच थकीत व एन.पी.ए. झालेली कर्ज वसुली करून साठलेला तोटा कमी करण्यात यशस्वी झाले. तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून 49 कोटी रूपयाचे भागभांडवल प्राप्त करून घेतल्याने साल सन 2013 च्या आर्थिक स्थितीचा विचार करून भारतीय रिझव्र्ह बँकेकडुन तब्बल 60 वर्षानंतर बँकेस बँकीेग परवाना दिला गेला आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेतील 2 वर्षाची कामगिरीची नोंद घेवुन Banking Frontier कडुन साल सन 2013 चा राष्ट्रीय स्तरावरील Best Youth CEO of DCCB चा पुरस्कार देवुन गौरविण्यात आलेले आहे. तसेच नवी दिल्ली स्थित FACE या सामाजिक व आर्थीक क्षेत्रात काम करणा­या संस्थेमार्फत Excellence in Co-operative Banking 2013 हा पुरस्कार देवुन श्री.घोणसे पाटील यांचा सन्मान केलेला आहे. धुळे व पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या भगवान भाऊ गवळी मित्रपरिवाराकडुन ""उत्तुंग शिखरासमान कर्तुत्व'' आणि धुळे नंदुरबार जिल्हा बँक आजी माजी कर्मचा­यांकडुन "सन्मानपत्र व बोधचिन्ह' देवुन श्री.घोणसे पाटील यांचा सन्मान केलेला आहे. श्री.घोणसे पाटील यांचे सहकारी बॅकींग, जिल्हा देखरेख संघ, अनिष्ट तफावत तसेच प्रा.वैद्यनाथन कमेटी इत्यादी विषयावरील अभ्यासपुर्ण लेख महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व्दारे प्रकाशित सहकार महाराष्ट्र या मासिकामध्ये प्रकाशित झालेले आहे. श्री.घोणसे पाटील हे उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी/कार्यकारी संचालक पदी साल सन 2016 ते 2019 व नंतर 2021 पासुन आजतागायत कार्यरत आहेत. सद्यस्थितीमध्ये उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या सर्व कर्मचा­यांचेकडुन थकीत कर्जदार सभासद व संस्था यांचे थकीत कर्ज वसुली साठी थकीत कर्ज वसुली अभियान अंतर्गत बैठा सत्यागृह करण्यात येत असुन थकीत कर्ज वसुलीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उस्मानाबाद जिल्हा बँक नजिकच्या कालावधीमध्ये श्री.विजय घोणसे पाटील यांचे प्रयत्नामुळे आर्थिक अडचणीतुन बाहेर येवुन पुन:श्च जिल्ह्रातील खातेदारांचे सेवेत कार्यरत होईल या तिळमात्र शंका नाही. उस्मानाबाद जिल्ह्रातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अवसायक म्हणुन कार्यरत असुन सदरील कारखाना दिर्घमुदतीचे कालावधीमध्ये सक्षम अशा संस्थेस चालवावयास देण्यासंबंधाने प्रयत्नशील आहेत. तसेच तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना मागील हंगामात सक्षम अशा कारखान्यास चालवावयास दिलेला असून यातुन मिळणा­या भाड¬ातुन बँकेस आर्थिक प्राप्ती होणार आहे. एकंदर श्री.घोणसे पाटील यांचे बँकींग मधील प्रदिर्ध अनुभव उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या उन्नतीसाठी, भरभराटीसाठी उपयोगी पडत आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सहकार्याने व घोणसे पाटील यांचे प्रयत्नाने उस्मानाबाद जिल्हा बँक नजिकच्या कालावधीमध्ये आर्थीक दृष्ट¬ा सक्षम बँक म्हणुन नावारूपास येणार यात कोणतीच शंका नाही…

 

 

मा.श्री.व्यंकट लिंबराज घोगरे

प्र .-सरव्यवस्थापक

मा.श्री.व्यंकट लिंबराज घोगरे

प्र .-सरव्यवस्थापक

श्री.व्यंकट लिंबराज घोगरे हे या बँकेचे उपसरव्यवस्थापक आहेत. त्यांनी या बँकेच्या सेवेची सुरूवात साल सन 1990 मध्ये लिपीक पदापासून करून ते आज उपसरव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे प्रशासन, वित्त, वसुली व कायदा विभागाचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. श्री.घोगरे यांनी कला विषयातील पदवी मिळविलेली असून त्यांनी सहकारामधील उच्चतम सहकार व्यवस्थापन पदविका (HDCM) प्राप्त केलेली आहे. त्यांना बँकींग क्षेत्रातील 32 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांनी शाखास्तरावर विविध पदांवर कामकाज केलेले असून बहुतांश सेवेचा कालावधी हा मुख्यालयातील वित्त/वसुली, बिगरशेती, हिशोब , प्रशासन विभागात गेलेला असल्याने त्यांना मुख्यालयातील विविध विभागातील कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांनी शेती कर्जवाटपाचे धोरणामध्ये महत्वाची भुमिका पार पाडलेली आहे. त्यांच्यामध्ये कुशल नेतृत्व, सांघिक कामकाजाचे व्यवस्थापन, सर्व स्तरावरील योग्य समन्वय ठेवून काम करण्याची सचोटी, बँकेबद्दलची आत्मियता, तसेच कोणत्याही विषयाचा सुक्ष्म अभ्यास करून निर्णयाप्रत येण्याची वृत्ती, "बँक आपली आहे' हे ध्येय समोर ठेवून कामकाज करण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे या बँकेच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. बँकेच्या सर्व कामकाजामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. बँकेच्या धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना या बँकेच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल चांगल्या प्रकारची माहिती असून बँकेने ठरविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्वाचे कामकाज केलेले आहे.

 

मा. श्री. संजय एम. गायकवाड

प्र. मुख्याधिकारी प्रशासन व कायदा विभाग

मा.श्री.शहाजी पी.पाटील

प्र मुख्याधिकारी वित्त-वसूली विभाग

मा. श्री.प्रशांत एन.पाटील

उप मुख्याधिकारी हिशोब - आयटी , लेखा व तपासणी

मा.श्री.सुनिल टी. गायकवाड

उप मुख्याधिकारीी बिगरशेती कर्ज विभाग

मा.श्री. विनोद ए. लावंड

उप मुख्याधिकारी बिगरशेती कर्ज विभाग