आमच्याबद्दल जाणून घ्या
महाराष्ट्रात कृषी उद्योगाची औद्योगिक रुजवण खऱ्या अर्थाने सहकारी बँकेच्या पुढाकारानेच झाली, सहकारी बँक नव्हती तोपर्यंतचे कृषी प्रक्रिया उद्योग हे कुटीर उद्योगाच्या अवस्थेत होते. त्याला यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून औद्योगिक रूप देण्यात खरा पुढाकार घेतला तो सहकारी बँकेने.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. उस्मानाबाद या बँकेची नोंदणी दि. १७/०८/१९८४ रोजी झालेली असून त्याचा नोंदणी क्र. OSM/BNK/(C)26/84.85/Date 17/08/1984 हा आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. उस्मानाबाद या बँकेस मा. आर.बी.आय., मुंबई यांचेकडून दि. ०४/०६/२०१३ रोजी बँकिंग परवाना प्राप्त झालेला असून त्याचा क्र. RPCD(MRO)/1769/18.01.038/2012.13 Date 04/06/2013 हा आहे.
या बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा असून त्यामध्ये आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण गावांची संख्या ७३७ आहे.
या बँकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात एकूण ८१ शाखा कार्यरत असून मुख्यालय उस्मानाबाद येथे आहे. तसेच या बँकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची एकूण संख्या ४६७ आहे.
बँकेने राबविलेल्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा सर्व शेतकरी बांधव यांना झाला आहे. बँकेमार्फत लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले तसेच पतसंस्था, महिला बचत गट व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जवाटप केले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाला आहे. बँकेमार्फत आधुनिक बँकेचा वापर सुरू केला असून त्याआधारे ग्राहकांना सीबीएस., ए.बी.बी., आर.टी.जी.एस., के.सी.सी. इ. सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.उस्मानाबाद या बँकेत मायक्रो एटीएम , मोबाइल बँकिंग आणि एटीएम सुविधा उपलब्ध आहेत.